परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास
नास्तिकतेचा प्रवास करावा लागला नाही नमस्कार. आज या सगळ्यांची मनोगतं ऐकली. मागे मी एका दुसऱ्या मेळाव्याला गेले होते, भगतसिंग विचारांच्या. तिथंही अनेक जणांचा नास्तिकतेचा प्रवास मी ऐकला. तेव्हा मला माझ्या नशिबातून आलेलं वेगळेपण असं जाणवलं की, मला हा प्रवास कधी करावाच लागला नाही. मी आजी-आजोबांकडे वाढले, माझ्या आईच्या आई-वडिलांकडे! ते त्या काळामध्येसुद्धा कट्टर नास्तिक होते. …